तरल आणि भावस्पर्शी......
ती सिंड्रेला – समिक्षा बांगडे
आज परत एकदा सकाळ होत आली तरी सिंड्रेला अजून खिडकी पासुन हलली नव्हती. रात्र मावळतीला टेकली होती. आणि पहाट किरणे खिडकीतून आता डोकावू पहात होती.
फक्त अंगावरच्या जखमांतील उठणा-या वेदना तिला कुठे तरी जिवंत असल्याची जाणीव करून देत होत्या आणि त्या वेदनेसरशी रात्री दारूच्या झिंगेत तिला बेदम मारहाण करणारा तिचा प्रिन्स चार्मिंग मनात डोकावून जात होता...
वा-याच्या थंड झुळूकेच्या स्पर्शानी कळ उठली आणि ती भानावर आली.
घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्याचं हे असं सुख पदरी पडलं होतं तिच्या..
आज कित्येक वर्ष उलटली होती प्रिन्स चार्मिंगचा चार्म हरवून...पण सिंड्रेला मात्र तिच सैंन्डल अजुन ही जिवापाड जपत होती...