एक छोटासा संवाद आहे...तिचा...पण त्याचा आशय खूप मोठा आहे.
बंध – मेघा संगम पारडीकर
गल्लत होतेय, नको देऊस हात, अडखळू दे मला! नको बनूस ढाल, करु दे प्रतिकार! पांघरलय स्वतःला, पण संकोच माझा होतोय.
बघ स्वतःत डोकावून, गल्लत होतेय,
पसर आपल्या फांद्या, उमलूदे घमघमू दे मलाही .
रेशिम? छे! फसवा आहे हा शब्द .
शेवटी 'बंधच' तो!