Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

इन्स्पेक्टर आणि गाढव - Chetan Gugale

0
0

चेतनची ही गोष्ट वक्रोक्ती आहे...मस्त आहे...

विक्रम

इन्स्पेक्टर आणि गाढव – चेतन गुगले

आटपाट नगरात एक कर्तव्यनिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. हरीश लक्ष्मण वागळे यांची नेमणूक झालेली होती. त्यांचे सहकारी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्री. रितेश पुणेकर आणि हवालदार श्री. भीम राव देखील त्यांच्यासोबत त्याच ठाण्यात कार्यरत होते. हा हवालदार भीम राव म्हणजे अंगपिंडाने एकदम मजबूत उंचनिच आडवातिडवा असा माणूस होता. पैलवानासारखं शरीर असलं तरी त्याचं काळीज एकदम हळवं होतं. कुठलाही अन्याय त्याला सहन होत नसे. त्याच्या हातात एखादा गुन्हेगार सापडला की तो त्याला चांगलाच लोळवून असा काही तुडवीत असे की त्या गुन्हेगाराची तब्येत एकदम नरम पडून जाई. त्याच्या या आक्रमक वृत्तीला श्री. वागळे आल्यापासून त्यांनी आवर घातला होता. त्यामुळे त्याची आतल्या आत घुसमट होत असे. या घुसमटीतूनच गेल्या वर्षी त्याची अँजिओप्लॅस्टी झाली होती. वरिष्ठ व सहकार्यांनचे प्रेम आणि उत्तम इलाजामुळे तो त्यातून सावरला असला तरी हात कायद्याने बांधले गेले असल्याने आपण गुन्हेगारांना आवर घालू शकत नाही याचे शल्य त्याला बोचत असे. त्यावर तसाच एखादा जालीम गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यात सापडत नसेल तर त्याला सरळ करण्याकरिता भीमाला त्याची पैलवानकी गाजवायची आपण नक्की संधी देऊ असे आश्वासन श्री. वागळे यांनी दिले होते. त्यांच्याच सुचविण्यावरून त्याचा बिल्ला नंबर लक्षात घेत ठाण्यातले सारे कर्मचारी त्याला भीमा पैलवान ५७४३२ च म्हणत असत.

नगरात बाकी सारे काही आलबेल होते पण फक्त एकच समस्या होती ती म्हणजे गावातला खवीस खाटीक. हा खाटीक त्याच्या दुकानाच्या पुढे असलेल्या मोकळ्या जागेत अतिक्रमण करून मारलेले प्राणी उलटे लटकवून ठेवीत असे. या मृत प्राण्यांची घाण वार्यागसोबत पसरून जवळच असलेल्या बसथांब्यावर उभ्या प्रवाशांना फार त्रास होत असे. ह्या प्रवाशांनी कधी तक्रार केलीच तर खवीस खाटीक लगेच त्यांच्या अंगावर धावून जात अश्लील व असभ्य शब्दांत शिवीगाळ करीत असे.

प्रकरण फारच वाढत गेले तर पोलिस ठाण्यात त्याची नोंद होई, पण पुढे न्यायालयीन चकरा, साक्षीदारांची अनुपलब्धता, प्रवाशांचा परगावी असलेला निवास आणि प्रकरण घडलेली ती जागा आटपाट नगराच्या न्यायालयीन कक्षेत येणे या समस्यांमुळे तक्रारकर्त्यास त्या प्रकरणाला तडीस न्यायला जमत नसे. यामुळे खवीस खाटकाची जीभ फारच सैलावली होती. न्यायालयीन मार्गाने खवीस खाटकावर कारवाई होणे अवघड असले तरी प्रवाशांवर दादागिरी करणार्याक खवीस खाटकाची अन्यायी बाजू श्री. वागळेंना दिसत होती. त्यांनी खवीस खाटकाला अनेकदा प्रेमाने तर प्रसंगी दरडावून समजविण्याचा प्रयत्न केला होता. खवीस खाटकाने त्यांच्या या प्रयत्नाला अजिबात दाद दिली नाही उलट तोच वागळ्यांना त्यांच्या नावाचे लघुरूप करून हलवा (हरीश लक्ष्मण वागळे) असे चिडवीत असे आणि कधी त्यांचा सहाय्यक रितेश पुणेकर सोबत असेल तर हलवापुरी साथ साथ असे म्हणत फिदीफिदी हसत असे. अर्थात त्याच्या या चिडवणूकीने त्रास होत असला तरी तेवढ्यावरून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करता येत नसल्याने वागळे, पुणेकर आणि भीमा पैलवान अतिशय त्रस्त झाले होते.

तशातच राज्यात गोवंश हत्या बंदी झाली. आता शासनाचा कुठलाही नवा निर्णय म्हटला की तो काहींना रुचणार तसाच काहींना खुपणार देखील. या निर्णय खुपणार्यां त खाटीकदेखील आले. तेव्हा श्री. वागळे यांनी नगरातील खाटकांना आधी परिपत्रकाद्वारे शासकीय निर्णयाची माहिती पोचविली आणि जे कुणी या निर्णयाविरुद्ध वर्तन करतील त्यांच्यावर नाईलाजाने कारवाई करावी लागेल असे सूतोवाचही केले. झाले, खवीस खाटकाला आयतेच निमित्त मिळाले. त्याने इतर खाटकांनाही चिथावणी दिली आणि पोलिस ठाण्यावर मोठा मोर्चा नेला. आता खरे तर पोलिस लोक केवळ नियमाचे ताबेदार. त्यांचे काम अंमलबजावणी करायचे. निर्णय तर शासनाने घेतलेला. त्यातही हे शासन कसे? तर लोकनियुक्त लोकशाही मार्गाने २८८ पैकी १८८ जागी सदस्य निवडून बनविलेले. आता हा निर्णय घेताना तो तमाम जनतेला नाही तरी निदान बहुसंख्यांना तरी आवडलेला असणारच ना?

शासनाचा निर्णय खुपणार्यांमनी तर पोलिस ठाण्यावाहेर गर्दी केली खरी पण निर्णय आवडलेले लोक काही घराबाहेर येऊन पोलिसांच्या समर्थनार्थ उभे राहिले नाहीत. वाईट गोष्टींसाठी वाईट लोक एकत्र लवकर येतात कारण निंदा करायला, शिव्या घालायला फारशी अक्कल लागत नाही. मात्र काही रचनात्मक (क्रिएटीव्ह) करायला खूप अक्कल लागते. समस्या ही आहे की चांगले लोक "चलता है", "जाऊ दे, आपल्याला काय करायचंय", किंवा "शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरात" ही भूमिका घेताना दिसतात. थोडक्यात, अशा बाबतीत स्वतःच्या बुडाला त्रास झाला तरच बोलतात, किंवा तिथेही शेपूट घालतात. जो पर्यंत सत्प्रवृत्तीचे लोक एक होत नाहीत, किंवा एक होण्याचा वेग वाढत नाहीत तो पर्यंत असंच होत राहणार.

शिवाय, आपला वेळ अशा घाणेरड्या लोकांशी प्रतिवाद करण्यात का घालवा असा विचार लोक करतात - यात काही चूक नाही. कुणाची तरी याच अर्थाची इंग्रजी म्हण आहे की वाईट लोक ज्या वेगाने एकत्र येतात त्याच वेगाने चांगले लोक एकत्र आले तर......असं काहीतरी.

श्री. वागळे आणि सहकारी बाहेर येऊन मोर्चेकर्यां ना पोलिस कायदाकर्ते नसून केवळ कायदापालनकर्ते आहे हीच बाब समजावू लागले. त्यांना पाहताच खवीस खाटकाला अजूनच चेव चढला. तो पुढे सरकत मोठमोठ्याने मुर्दाबादच्या घोषणा देऊ लागला. जमावाला पांगविण्याकरिता भीमा पैलवान काठी फिरवीत पुढे सरसावला. त्यावर खवीस खाटीक ओरडला, "ए पैलवाना तुला काय हालवायचं ते तुझ्या हलवा सायबांपुढे हालव. आमच्या म्होरं तुजा ह्यो दांडा हालवू नकोस. समजला काय?" हे ऐकताच भीमाचे डोळे लालबुंद झाले. मुठी आवळल्या गेल्या. तो आता खवीस खाटकाची खांडोळीच करण्याच्या आवेशात आला हे पाहून श्री. वागळ्यांनी त्याला थोपविले. बोपखेल प्रकरणात दंगेखोर जमावावर पोलिसांनी जोरदार लाठीमार करून दंगेखोरांना तिथल्या तिथे धडा शिकविणारे पोलिस कर्मचारी त्यांच्या डोळ्यासमोर आले. असले शॉर्टकट्स न आवडणारे आणि गुन्हेगारांना कायदेशीर प्रक्रियेनेच शासन घडविण्यावर विश्वास असलेले वागळे आपल्या ठाण्यासमोर असा प्रकार घडू देण्यास अजिबात तयार नव्हते. ते पुढे येत मध्यस्थी करू लागले तसा खवीस खाटीक अजूनच सैलावला. "तुमचा कायदा गाढव. तो बनविणारे गाढव आणि त्याची अंमलबजावणी करणारे तुम्ही गाढव" असे तो म्हणाला. नेमके या ठिकाणी वार्तांकन करणारे पत्रकार या घटनेचे चित्रीकरण करीत होते. ते पाहताच वागळ्यांचे डोळे आनंदाने चमकले. लगेच त्यांनी आपल्या सहकार्यां ना आत नेले. पत्रकारांनाही आत बोलावून त्यांच्या कॅमेर्याकतील एसडीकार्डावरून कार्यालयातील संगणकावर चित्रफीत कॉपी करून घेतली. चित्रीकरण अगदी सुस्पष्ट होते. खवीस खाटकाचा आवाजही अगदी स्पष्ट ऐकू येत होता.

लगेच वागळ्यांनी स्वतःच खवीस खाटकाविरुद्ध तक्रार लिहिली. पत्रकारांच्या साक्षीही नोंदविल्या आणि शिवाय चित्रफितीचा सज्जड पुरावादेखील हाताशी होताच. दुसर्याग दिवशी त्यांनी स्वतः जस्टीस विजय गलगलींची भेट घेऊन त्यांना सारा वृत्तांत कथन केला. खवीस खाटकाची अपकीर्ती गलगलीसाहेबांपर्यंत आधीच पोचली होती पण कायदेशीर प्रक्रिया होऊन त्याला शिक्षा मिळण्यात येत असलेल्या अनंत अडचणीही त्यांना ठाऊक होत्या. आता ह्या प्रकरणात मात्र तो बरोबर सापडला होता. गलगलींनी न्यायालयाच्या कर्मचार्यातमार्फत खवीस खाटकाला ताबडतोब बोलावून घेतले. तो येताच त्यांच्या चेंबरमध्ये पोनि वागळे व त्यांच्या सहकार्यांलसमवेत खवीस खाटकाशी चर्चा सुरू केली. त्याच्यावर शासकीय निर्णयाचा अवमान करणे, जबाबदार शासकीय अधिकार्याटस "गाढव" म्हणणे,जनतेला दंगा करण्यास चिथावणी देणे आदी आरोप ठेवले जातील असे सांगितले. शिवाय त्याच्यावर खटला चालवला जाऊन त्यास तडीपार देखील केले जाऊ शकते असाही इशारा दिला.

हे ऐकताच खवीस खाटीक नरमला. भविष्यात अशी आगळीक आपण करणार असे त्याने कबूल केल्यावर मग श्री. वागळे यांनी देखील फारसे न ताणता ते प्रकरण तिथेच सोडून देण्याची तयारी दर्शविली. गलगलींच्या चेंबरमध्येच चहापानाचा लहानसा औपचारिक सोपस्कार पार पाडत दोन्ही बाजूंकडून मैत्रिपूर्ण संबंधांची ग्वाही दिली गेली. चेंबरमधून बाहेर पडताच खवीस खाटकाचा जन्मजात खोडकर असलेला स्वभाव उफाळून आला. तो जस्टीस गलगलींना म्हणाला, "आजपासून जुना खवीस मेला. पार तडीपार झाला. आता नवा ख-वीस जन्माला आला. महाराज मी म्हणजेच हा नवा ख-वीस आपल्याला वचन देतो की मी यापुढे इन्स्पेक्टर साहेबांना कधीही गाढव म्हणणार नाही. इतकेच काय कुणालाच म्हणणार नाही. गाढवाला देखील गाढव म्हणणार नाही. गाढवालादेखील इन्स्पेक्टर साहेबच म्हणत जाईल. रेम्याडोक्या पैलवानालाही आदरणीय वंदनीय म्हणत जाईल." त्यावर सारेच त्याच्याकडे चमकून पाहू लागले.

"तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नाही काय? पाहा तुमच्यासमोरच म्हणतो - कसं काय इन्स्पेक्टर वागळेसाहेब? कसे आहात? आणि आदरणीय वंदनीय भीमराव तुम्हीदेखील कसे आहात?"

प्रत्यक्षात असभ्य शब्द न वापरताही खोडी काढायची खवीस कसायाची ही युक्ती सर्वांच्या लक्षात आली. भीमा पैलवान त्याला मारायला हात उचलू लागताच खवीस खाटीक चटकन पोनि वागळ्यांच्या मागे लपला आणि म्हणाला, "मला वाचवा हो इन्स्पेक्टर सायेब. आता माझी काय चुकी झाली? मी तुम्हाला बी इन्स्पेक्टर म्हटलं यांनाही आदर्णीय वंदनीय म्हटलं तरीबी हे मला माराया धावले." वागळे लगेच उत्तरले, "अरे हो हो. घाबरू नको मी आहे ना? मी समजावतो त्याला. तेही तुझ्यासमोरच." असे म्हणत ते भीमा पैलवानाकडे वळले, " कसंय भीमराव, तुमची वेदना मला समजली. पण आपण कायद्याने या खाटकाची बोली सुधारवू शकतो त्याची नियत सुधारवणं कायद्याने जमणार नाही. तशी अपेक्षा पण नाही. कुत्र्याचे शेपूट अगदी कठीण सरळ अशा नळीत घातले आणि नळी कितीही काळाने काढून घेतली तरी पुन्हा ते वाकडे होणारच त्याला इलाज नाही. पण इथे एक मेख आहे आता ही शेपटी कायमची नळीतच अडकवून ठेवली तर? आता ह्या खाटकाची शेपूटही कायमची या आदरणीय वंदनीय च्या नळीत अडकून पडलीय. त्याला कबूल करावंच लागलं ना की जुना खवीस जाऊन आता नवा ख-वीस जन्मलाय.

हा बदलही पुरेसा आहे. तो म्हणतोय की गाढवाला देखील इन्स्पेक्टर म्हणेल आणि म्हणून तो मला इन्स्पेक्टर म्हणतोय. पण तो खरोखरच्या गाढवाला इन्स्पेक्टर म्हणेल का? एकटा असताना म्हणाला तर कुणाला चिडविल्याचे समाधानही त्याला मिळणार नाही आणि जाहीरपणे चारचौघात म्हणाला तर ते लोकच त्याला हसतील. शेवटी स्वतःची लाज वाचविण्याकरता तरी त्याला इन्स्पेक्टरलाच इन्स्पेक्टर म्हणावं लागेल. शिवाय आता माझं बोलणं ऐकून त्याने ही त्याची आदरणीय वंदनीयची टेप बंद केली तरी शेवटी माझं ऐकून त्याला त्याचं हे नवं खोड्या काढायचं धोरण बदलावं लागलं म्हणजे तोही त्याचा एक प्रकारे पराभवच ठरेल. थोडक्यात काय तर त्याने स्वतःच स्वतःच्या शरीराच्या विशिष्ट भागात पाचर मारून ठेवलीय जी त्याला काढताही येणार नाही आणि सहन देखील करता येणार नाही."

पोनि वागळ्यांचे हे बोलणे ऐकून त्यांचे सारे सहकारी आणी जस्टीस गलगलीही हसू लागले आणि खवीस (की ख-वीस) खाटीक एवढेसे तोंड करून तेथून निघून गेला.


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Latest Images

Trending Articles





Latest Images