नम्रता कुलकर्णी सरपोतदार हिने कथेचा वेगळा आकृतिबंध आपल्यासमोर आणला आहे...वाचा....\
विक्रम
एक ऑफबीट प्रेम !!! – नम्रता कुलकर्णी सरपोतदार
दुरूनच दिसली तुझी सावली …
माझ्या गालावर कळी खुलली...
तूझं पाऊल ही हळूहळू माझ्या कडे वळलं..
उगाच का माझं हृदय आतल्याआत धडधडल.
रुबाबदार असा तू माझ्या समोर येऊन उभा राहिलास..
असं वाटलं मनातल्या मनात तू हि थोडासा लाजलास...
तुझ्या डोळ्यातले तेज पाहून मी हि थोडीशी भुलले ...
माझ्या गालावर खिळणारी बट बाजूला सरायला तुझे हात हि सरसावले..
त्या काही क्षणात मला होत होते वेगवेगळे आभास...
तितक्यात माझ्या नाजूक बोटांना हातात घेत तू म्हणालास ...." किती गोड तू हसतेस...!!!
तुझ्या त्या स्पर्शने मी मोहरून गेले...
खरचं का तुला हि तसे काहीसे जाणवले..
तुझ्या चेहऱ्यावरचे भाव हि बद्दलले वाटले..
बहुधा तुझे हि मन आतल्याआत उमलून गेले..
तुझ्या त्या बोलण्याने मला वेड लावले..
आणि माझ्या मनातले शब्द ओठांवरच राहिले.. असा वाटलं प्रीतीने बहरलेल्या क्षणात आपण हरवून जाऊया...
तितक्यात माझा हात ओढत तू म्हणालास "कुठे हरवलीस चाल एक कप cutting घेऊया...!!!
चहाचा सुगंध सगळी कडे दरवळत होता..
तुझ्या हातातला माझा हात काही केल्या सुटत नव्हता...
वाफाळता चहा तू ऐटीत माझ्या समोर धरल्यास..
खरचं का त्या नजरेतून माझ्याशी काहीतरी बोललास..
काही क्षण फक्त तुझ्याच कडे पहावे असे वाटत होते..
प्रत्येक घोटागणिक तुझे लक्ष माझ्या कडे होते..
माझ्या हातातला तो कप घेत तू खुदकन हसलास ..
मनातल्या भिंतीत घर करून गेलास..
असं वाटलं तुझ्या बरोबर घ्यावी एक उंच भरारी ..
तितक्यात माझ्या डोळ्या पुढे टिचकी वाजवत तू म्हणालास "काय madam जायचं नाही का आज
घरी"...!!!
आता खरंच कुठेच जावस वाटत नव्हतं...
तुझ्या अवतीभवती मन माझा गुरफटत होतं..
तुला हि का तसंच काहीस होत होत ..
कारण तुझं ही पाऊल काही केल्या पुढे सरकत नव्हतं ..
डोळ्यांच्या पापण्यातूनच तुला मी बिलगले
नाही ना ! तुला ह्यातले काही उमगले ..
असं वाटलं , आता तू माझ्या पासून खूप दूर जातोय...
तितक्यात माझ्या नजरेला नजर देत यु म्हणालास , " विसरू नकोस रात्री तुझ्या मेसेजची
वाट बघतोय ...!!!
हे ऐकताच माझ्या समोर पहाट झाली ..
मनातल्या अंधारात एक नवीन जोत पेटली...
तू असं का म्हणालास ह्या विचारातच रात्र झाली
उगाच मग कागदांवर काही अक्षर गिरवली.. . खरंच बसला असशील का तू , मेसेज ची वाट पाहात..
का रामला अशील मित्रांशी गप्पा मारण्यात ...
तुला काय रे , मेसेज पाठव असं सांगणं सोपं होतं ...
पण नेमकं काय पाठवावं हेच मला सुचत नव्हतं
असं वाटलं मी काही पाठवलं तर तू उगाच माझ्या वर हसशील..
तितक्यात तुझाच मेसेज आला आणि म्हणालास , " काय हे साधं GOOD NIGHT
पाठवायला किती विचार करशील ..!!!
आता मला तूझा खूप राग आला होता..
का उगाच माझ्या मनाशी खेळात होता ...
दुरून सुद्धा तुला माझ्या मनातलं काळात होतं..
तरी का तुझ्या मनाला काही जाणवत नव्हतं ...
तुझ्या बोलण्याचे अर्थ मला काळात नव्हते ..
का मग मीच कुठे तरी चुकत होते ...
असं वाटलं कुठे लपवावं हे डोळ्यातलं पाणि..
तितक्यात मेसेज आला , " स्वपनातं आली एक परी ,एक होतं राजा एक राणी ...!!!
आजचा दिवस उदासच गेला ...
नेहमी सारखी मी रोजच्याच रस्त्याने जात होते ...
तू समोरून येतांना दिसलास , आणि वाटले का ते स्वप्न होते ...
तुझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं ..
पण माझं मन उगाच थोड भाव खात होत...
कशी आहेस , असं नजरेतूनच तू मला विचारलास ..
तुला काय वाटलं मला नाही ते जाणवलं ...
माझ्या नकळत तू मला कुठे तरी लांब नेलं..
माझं मन थोडस घाबरलं ... असं वाटलं , आता सगळं विसरून तू माझ्याशीच बोलावसं ...
तितक्यात माझ्या थोडस जवळ येत तू म्हणालास .." चिडल्यावर सुद्धा तू छान दिसतेस ..!!!
तुला मी काहीच नाही जाणवू दिलं ..
पण मन मात्र आतल्याआत थोडस हसलं ...
अवतीभवती मोकळा वारा सुटला होता..
ढग दाटून आले तरी पाऊस काही पडत नव्हता...
काही क्षण निशब्द शान्तता होती ...
मनातली बेचैनी उगाच वाढत होती ...
मला काही वाटायच्या आत , तू माझी नजर तुझ्याकडे वाळवळीस
आणि माझा हात तुझ्या दोन्ही हातात घेत तू बोलू लागलास.... !!!
नको रागवूस तू माझ्यावर अशी ...
मग रुस्तो मी माझ्या मनाशी ...
तुला काय वाटलं मला काहीच का समजत नव्हते ..
वेडे , तुला काळ एक दिवसात जसे जाणवले , ते मला कित्येक वर्ष होत होते ..
तुला पाहता क्षणी तू मला आवडली होतीस ..
पण तेव्हा तुझ्याशी मैत्री करण्या इतपतच माझी हिम्मत होती ...
कित्येक वेळा तरी आपण ग्रुप ने फिरायला जायचो ...
तेव्हा ही माझ्या मनातले भाव मनातच ठेवून परतायचो ...
डिग्री मिळाल्यावर तुझ्या गालावर पडलेली खळी मी आजून ही विसरलेलो नाही ...
तेव्हा नकळत माझ्या खांद्यावर हात टाकत तू म्हणाली होतीस .." CONGRATS MITRA , WE दीड इट ! सही !!!
आता आपल्या सगळ्यांचे मार्ग वेगळे होणार होते ..
पण आपल्या मैत्रीतले नाते घट्ट होत होते ..
कधी तरी काही गोष्टी तू फक्त मलाच येऊन सांगायचीस..
मग आंनदाने हसत निगुन जायचीस ...
कधी माझा फोने नाही लागला तर थोडीशी चिडायचीस ..
मग उगाच कोणाच्या तरी नावावरून मला चिडवायचीस ...
कधी माझ्या गोंधळलेल्या मनाला तू छान समजवायचीस...
भडकलेल्या माझ्या डोक्यला तुझ्या बोलण्याने शांत करायचीस...
जॉब लागल्यावर तुझ्या डोळ्यातला आनंद आजून ही माझ्या लक्षात आहे ..
तेव्ह माझं हात हातात घेऊन तू म्हणाली ," तरी आजून खूप काही जिकायचं आहे ...!!!
जीवनातले वेगवेगळे टप्पे आपण गाठत होतो ..
अधून मधून वेळ काढून भेटत होतो ...
तुला भेटायला नाही जमणार असं कळल्यावर मन उदास व्हायचं ..
पण तूझा मेसेज आली की , आपोआप हसायचं ...
आजून ही मला तो दिवस स्पष्ट आठवतोय , जेव्हा माझ्या आयुष्यातली उंच भरारी मी घेणार होतो ..
तेव्हा खरंच एकदा असं ही वाटलं का मी तुला कायमचा गमावणार होतो ...
मन आंनदाने उमलून गेलं होत ..
तुला भेटण्यासाठी आतुर झालं होत ....
ती गोष्ट ऐकताच ,माझ्या पेक्षा , तूच खूप खुश झाली होतीस ...
तेव्हा माझ्या समोर हात करून म्हणालीस ," USA ला चालल्यास , दारू नाही ना पिणार , प्रॉमिस ...!!!!
तुला ही हेच कसे सांगायला सुचले
पण तरी तुझ्यात्या बोलण्याने अंगात बळ आले....
मनात तुझ्या साठी एक वेगळा कप्पा `तयार झाला होता ...
तुला त्या बद्दल सांगावं का असं विचार येत होता ...
मन माझं खूप बेचेन झालं होत ..
तुला का ते जाणवत नव्हतं ....
त्या दिवशी माझ्या डोळ्यात पाणि तरळत होत .. तू ते पुसावंस असं खूप वाटत होत ....
निघत निघत जाणवलं , "आता तर तू मला सहज विसरून जाशील ...
तेवढ्यात तूझा मेसेज आला ,- " HAPPY JOURNEY .., आता काय बाबा तू खूप मोठा होऊन येशील आणि मला विसरलेला ही असशील ...."!!!!
तुला काय माहीत माझ्या मनात काय चाललं होत ..
किव्हा तू;अ समजून ही तुला काही काळात नव्हतं ...
काही दिवस आपण नियमित chatting करत होतो ...
पण नंतर वेळच नाही जुळायचा , कारण आपल्या आयुष्यात आपण बुसीय होत होतो ...
तराई तुझे फेसबुक वरचे updates मी नियमित पाहायचो..
पण त्यावर कधीच रिपलायनाही करायचो .....
त्या फोटोतला तुझ्या बाजूचा टोपाहून insescure वाटायचं ...
उगाच मग माझं मन कावर बावर व्ह्याचं...
कधी एक संध्याकाळी खूप एकटं वाटायचं ..
तुला ही का कधी असं काहीस व्हायचं ...
त्या skirt मधल्या मुली पाहून कधीतरी एखादी ती मनात बसायची ...
पण रात्री झोपतांना तुझ्या गालावर खिलणारी बटचं मला आठवायची ..!!!
माझ्या इतक्या जवळ असून सुद्धा का तुला माझं प्रेम जाणवलं नसेल , असं प्रश्न लांब गेल्यावर मला पडला होता ...
पण तू ही किती निरागसपणे माझ्या सहवासात असायचीस , बहुदा असं काही विचार करायला तुला वेळच नव्हतं ...
एक वेगळाच अनुभव मी तिथे घेतला होता...
कुठेतरी साठवून ठेवावा असाच तो होता ...
वर्ष आता हळूहळू सरलं होत ..
माझं ही तिथे खूप कौतुक झालं होत....
आपल्या मातीचा सुगंध घेण्याचा तोदिवस आला होता ...
मनातला तो कप्पा तुला भेटण्यासाठी कासावीस झाला होता ...!!!
असं वाटलं सगळं आसमंत माझ्या स्वागतासाठी तिथे हजर होता ...
तुला ही तिथे पाहून माझ्या मनातला पक्षी आकाशात उडत होता ...
तुझ्या डोळ्यात मला वेगळीच चमक दिसली ...
तुझ्यातली बेचैनी मला थोडीशी जाणवली....
असं वाटलं तुला माझ्याशी खूप काही तरी बोलायचंय...
मनात साठवलेलं बरच काही सांगायचंय ...
आपल्या इतके वर्षांच्या मैत्रीमध्ये तू मला काल पहिल्यांदा स्वतःहून भेटल्या बोलावलं होत.... तेव्हा मला तुझ्या मनातलं सारं काही समजलं....
थोडस हसू आला आणि वाटलं मी एक वर्ष तुझ्या पासून offbeat काय गेलो , तुला हे काय झालं होत .... आपल्या नात्यातला गोडवा तुला जाणवला , आणि मी लांब गेल्यावर मला जे होत होत , तसंच तुला इथे झालं होत ....!!!!
आणि तू बोलायचं थांबलास..................
काही क्षण परत सगळीकडे निःशब्द शांतता पसरली होती ...
हृदयातली धडधड फक्त ऐकू येत होती ...
माझ्या डोळ्यातले अश्रू माझ्या गालावर बरसू लागले ...
तुझ्या हाताने तू हळुवार ते पुसले...
मला हे सगळं समजायला का इतकी वर्ष लागली
आणि तुला कसं काही क्षणात माझी भावना समजली ....
किती matured झाला होतास रे तू ..
लांब असून ही किती जवळ होतास माझ्या तू ...
इतकी वर्ष माझं तुझ्याशी निरागसपणे वागणं खरंतर प्रेम होत ...
पण त्या वर्षात मला ते जाणवलं होत .....
माझ्या खांद्यावर हात टाकत म्हणालास , "शांत हो किती चलबिचल होशील ...
अग थोडस offbeat गेल्यावर उलगडलेलं प्रेम तू ही कसे विसरशील ...!!!
आता काहीच बोलायची गरज नाही वाटली ...
त्याच्या ओठांवरून हळूच माझी बोट फिरवली ...
एक मोकळा श्वास घेतल्या सारखं वाटलं ...
दोघांच्या मनाला सर काही समजलं ....
मी थोडीशी तुझ्या कुशीत शिरले , आणि आजून थोडस जवळ ओढत तू म्हणालास , " काय मग फेसबुकचे स्टेटस change करायचे की नाही ....
मग उगाच थोडीशी लाडात येत मी म्हणले ." आता अशी माझी मस्करी करायची नाही ....
त्या क्षणाला तू किती खदखदून हसलास ....आणि माझ्या गालावर खिळणारी बट बाजूला करत म्हणालास -" हे आज मला पहिल्यन्दा जाणवतंय , की लाजल्यावर तू फार सुंदर दिसतेस ...!!!
आणि दाटून आलेले ढग बरसू लागले..........!!!!!
त्याच प्रमाणे तिच्या ही डोळ्यातलं पाणि ढसाढसा बाहेर पडलं...भितीवरच्या सुंदर अशा त्या तिच्या फोटोकडे पाहात ...तिने ती धुळीने माखलेली डायरी बाजूला ठेवली ... आणि खिडकीत उभ्या असलेल्या दादाला जाऊन बिलगली ....
आणि तिला वाहिनीचे शब्द आठवले " अग, पाऊस नुसता आनंदच देतो असे नाही .... तर...त्याच्या सरींनमध्ये साठवणी ही असतात ...कधी लढण्याची ताकद देतो , तर कधी अस्तित्व विसरायला लावतो ...तर कधी नुसताचं आठवणी जाग्या करण्यासाठी बरसतो .... प्रत्येका साठी तो वेगळ्या करणे येतो ....नाही का रे ....?????? पण दर वर्षी नचूकता येतोच....
आणि खिडकीतून येणारे तुषार अंगावर साठू लागले....