एका फोनवर जेंव्हा आयुष्य तोललेले असते....
मृगसर - विनोद बैरागी
कारचा दरवाजा ढकलून तो ऑफिस मध्ये पोहचला. केबीनमधल्या रिव्हॉलव्हींग चेअरच्या पाठीमागची खिडकी उघडून शुन्यात नजर लावून दुरवर काहीतरी शोधत उभा होता.
नेहमीच्या हिवाळ्यातला धुक्यात हरवलेला तो स्वच्छ तलाव.त्यात विहरणारी बदकांची जोडी.ऊमललेली गुलाबी कमळं.प्रतीबिंबीत होणारं सुर्यबिंब.सगळं काही जसच्या तसंच होतं आजही.तरीही बरंच काही कमी भासत होतं.
बाहेरून येणाऱ्या थंडगार वा-याच्या झुळूकीने अंगावर अक्षरश: काटा ऊभा राहीला त्याच्या.काहीतरी जाणवलं त्या शहा-यात.सवयीने मोबाईल चाळला पण तीचा कॉल नव्हता. नेहमी प्रमाणे "स्वेटर का घातलं नाहीस?...तु आजारी पडलास तर मला त्रास होतो...हे तुला प्रत्येक थंडीत सांगायलाच हवं का...."असं खडसावणारा कॉल अद्याप आला नव्हता.
हिवाळा चालु झाल्याचं हवेतील गारवा सांगत होता.पण आता कदाचित असं रागावून प्रेम व्यक्त करणारा कॉल कधीच येणार नाही याची जाणीव होऊन हिवाळ्यातही त्याच्या डोळ्यातून मृगाच्या सरी कोसळू लागल्या.....